*कोल्हापुरातून जाणाऱ्या कर्नाटक सीमावर्ती भागात एस.टी.ची वाहतूक अंशतः बंद---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
गेले काही दिवस महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये तणाव निर्माण झाला असून, काही ठिकाणी हिंसक घटना घडलेल्या आहेत, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन, कोल्हापूर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार, एस.टी. महामंडळाने आपल्या कर्नाटक राज्यात विविध ठिकाणी जाणाऱ्या दैनंदिन 1156 एस.टी. बस फेऱ्यांपैकी, 382 एस.टी. बसेसच्या फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत अंशतः बंद ठेवल्या आहेत. कोल्हापूर शहरातून सौंदत्ती देवीच्या यात्रेसाठी, बऱ्याच भाविकांना भाविकांना घेऊन गेलेल्या एस.टी. बसेसच्या 145 गाड्या या आज मध्यरात्री पर्यंत, सुरक्षितरित्या कोल्हापुरात पोहोचत असून ,तसेच आवश्यकता वाटली तर या सर्व गाड्यांना, कर्नाटक शासनाचे पोलीस संरक्षण देण्याच्या बाबतीत, कर्नाटक राज्य पोलीस प्रशासनाने अश्वस्थ केले आहे .
सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर येथे दत्त जयंती निमित्त गेलेल्या दत्तभाविकांसाठी ,राज्य एस.टी. महामंडळाकडून, सोलापूर- अक्कलकोट -गाणगापूर या मार्गावर बऱ्याच जादा एस.टी. बसेसची व्यवस्था केली जात आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे सुद्धा दत्त जयंती निमित्त गेलेल्या दत्त भाविकांना, प्रवासादरम्यान कोणताही त्रास झालेला नसून, संपूर्ण यात्रा सुरळीत पार पडेल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.