*सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावात ,न्यू इंग्लिश स्कूल च्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सिध्देश्वर कला व शिक्षण प्रसारक मंडळ अलकुड (एस) ही संस्था १९९२ ची. या संस्थेतर्फे जत तालुक्यातील एकोंडी व कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे दोन माध्यमिक शाळा चालविल्या जातात. बळवंतराव यमगर बापू हे संस्थेचे अध्यक्ष आहेत.त्यांनी माजी मंत्री स्व. मदनभाऊ यांच्या काळात युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व कवठेमहांकाळ तालुका अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केले आहे.ते मका प्रकल्प रांजणीचे चेअरमन आहेत. माजी खासदार व मंत्री प्रतिक पाटील, खा. श्याम बेनेगल व तारीक अन्वर यांच्या खासदार फंडातून सन २०१२ मध्ये शाळेची इमारत उभी राहिली अशी यमगर बापूनी माहिती दिली.
मंगळवार दि.२८ फेब्रुवारी रोजी न्यू इंग्लिश स्कूल इरळी या शाळेतील दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष तथा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.
यावेळी महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे व संघटक विनोद पाटोळे उपस्थित होते. या शाळेत इरळी, गोरडवाडी, मोघमवाडी व बसाप्पवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकरी व वंचितांची मुले मुली शिकतात. मुंबईचे पी. एस. आय.सत्यशील पाटील हे या शाळेचे माजी विद्यार्थी. या शाळेने अनेक शिक्षक, इंजिनिअर, सैनिक व पोलीस घडवले आहेत. यावेळी रावसाहेब पाटील व प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी संस्था व शाळेच्या माध्यमातून बहुजन समाजातील लेकरांचे उत्कृष्ट शिक्षण होत असल्याने संस्था व शाळेचे अभिनंदन करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या व विविध स्पर्धामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक जे. बी. कुंभार यांनी केले.
यावेळी सरपंच सौ. संजना आठवले, माजी मुख्याध्यापक नाईक सर, सेवानिवृत्त शिक्षक तानाजी यादव, माजी सैनिक व पोलीस पाटील जगदीश पाटील, तुकाराम पाटील, हणमंत ओलेकर, चंद्रकांत यमगर, अंकुश व दिपक लांडगे, केराप्पा यादव व शाळेचे शिक्षक सर्वश्री शरद पाटील, दिलीप पाटील, विनायक गुरव, अशोक पाटील, अशोक मराठे, म्हारु बहिरम, विष्णू चौगुले व सौ. जयश्री शिंदे आणि अग्नी विनोद पाटोळे उपस्थित होते.