सांगलीत कसबा पुणे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश रविंद्र धंगेकर विजयी झाल्याबद्दल जिल्हा काँग्रेसकडून विजयी उत्सव--
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
महाराष्ट्र राज्यातील कसबा पुणे विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रकाश रवींद्र धंगेकर हे विजयी झाल्याबद्दल ,सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कडून फटाके उडवून, मिठाई वाटून विजयोउत्सव साजरा करण्यात आला
यावेळी जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले पाटील, आदिनाथ मगदूम ,श्रवण मगदूम, बाबगोंडा पाटील ,श्रीधर बारटक्के, नामदेव पठाडे, सुभाष पट्टणशेट्टी, प्रल्हाद नरळे, सुरेश गायकवाड, विजय यादव, कोळेकर, सिद्धराया गणाचार्य पंडित पवार, जन्नत नायकोडे, शमसाद नायकोडे, पैगंबर शेख, मौला वंटमोरे ,लालासाब तांबोळी, प्रकाश माने अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना सांगली जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले यांनी, कसबा पुणे येथील निवडणुकीत रवींद्र घंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय असून, आगामी येणाऱ्या महाराष्ट्रातील व भारतातील निवडणुकीची ही एक विजयाची सलामी असून, हा संपूर्ण विजय महाविकास आघाडीचा असल्याचे नमूद केले आहे. काँग्रेस पक्षाचे राहुलजी गांधी यांनी भारत जोडो अभियान पूर्ण केल्या नंतर, यापुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, भाजपाला चपराक बसून, पराभूत होणाऱ्या असल्याचे संकेत असल्याचे अजित ढोले यांनी सांगितले. भारतामध्ये आज जी प्रचंड प्रमाणात महागाई व बेरोजगारी वाढली आहे, या महागाई व बेरोजगारीच्या विरोधात जनता भाजपाला पूर्णपणे नेस्तनाबूत करेल व येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये जनतेच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे समविचारी पक्षांचा विजय होईल असे अजित ढोले पाटील यांनी सांगितले.