*कर्नाटक एस.टी. महामंडळाकडून कोल्हापूर ते बेळगाव प्रवासासाठी, अर्ध्या- अर्ध्या तासाला नॉनस्टॉप बस सेवा कार्यान्वित.---*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
कर्नाटक एस टी. महामंडळाकडून कोल्हापुरातून -बेळगाव ला जाण्यासाठी ,प्रवाशांच्या सोयीसाठी दर अर्ध्या -अर्ध्या तासाला नॉनस्टॉप एस.टी .बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे .दरम्यान कोल्हापूर ते बेळगाव पर्यंत असलेल्या प्रवासास ,आता प्रवाशांचा वेळ वाचणार असून ,जवळपास दोन तासात प्रवास हा पूर्ण होईल असे वाटते. गुरुवारपासून सकाळी 7:00 वाजल्यापासून ते सायंकाळी 6:30 पर्यंत ,कर्नाटक महामंडळाकडून सलग अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने, नॉनस्टॉप एस.टी. बस सेवा चालू केलेली असून ,या प्रवासा साठी कर्नाटक परिवहन मंडळाने सुमारे 24 बसेस या सेवेसाठी तयार ठेवल्या आहेत. कर्नाटक एस.टी. महामंडळाकडून या घेतलेल्या निर्णयाचे ,महाराष्ट्र व कर्नाटक मधील असणाऱ्या प्रवाशांनी स्वागत केले आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व प्रवासवेळ कमी करण्यासाठी कर्नाटक एस.टी .महामंडळाने जोरदार प्रयत्न चालू ठेवले आहे.