जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील पलूस मध्ये गौरवशाली परंपरा असणाऱ्या पलूस सहकारी बँकेला, सांगली जिल्ह्यात सर्व राष्ट्रीयकृत व सहकारी बँकात, सर्वात जास्त प्रमाणात सुमारे 35 कोटी रुपये कर्ज प्रकरणे, महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंजूर केल्याबद्दल गौरवण्यात आले आहे. आज पर्यंत पलूस मधील पलूस सहकारी बँकेने, सन्माननीय सभासद ,ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक यांच्या विश्वासास पात्र राहून व सन्माननीय चेअरमन मा. वैभवरावजी पुदाले, मा. व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील व सन्माननीय सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तसेच व्यवस्थापक अनिल घारे यांच्या व्यवस्थापनाखाली कार्यरत असलेल्या पलूस सहकारी बँकेने, सांगली जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रात नाव नावलौकिक निर्माण केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील व सांगलीचे मा. जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना, बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश आप्पा पाटील, संचालक शिवप्रसाद आप्पा शिंदे, उपव्यवस्थापक नारायण सगळे आदी मान्यवर गौरव समारंभास उपस्थित होते. सदरहू पलूस सहकारी बँकेस गौरवण्यात आल्यामुळे, बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार ,हितचिंतक व सन्माननीय सर्व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.