जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )भारतात बँकांमध्ये बेवारसपणे पडून असलेल्या व दहा वर्षे दावा न सांगितलेल्या 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा, आता आर.बी.आय. मार्फत शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार, बेवारसपणे पडून असलेली रक्कम अथवा 10 वर्ष दावा न केलेली रक्कम, ही तयार केलेल्या शिक्षण व जागरूकता निधीमध्ये वर्ग केली जाते.
दरम्यान गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने, बँकांमध्ये बेवारसपणे पडून असलेल्या तसेच ठेवीदारांनी अथवा लाभार्थ्यांनी दावा न केलेल्या ठेवींचा तपशील मिळण्यासाठी, केंद्रीकृत पोर्टल ची स्थापना करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी चलनविषयक धोरण जाहीर करताना, वेब पोर्टल सुरू करण्यात आल्याची घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशिकांत दास यांच्या मते वेब पोर्टल द्वारे, बँकांमध्ये बेवारस पडून असलेल्या ठेवींचा अथवा 10 वर्षे होऊन अधिक कालावधीमध्ये दावा न केलेल्या ठेवींचा, शोध घेण्यासाठी वेब पोर्टल अत्यंत उपयोगी ठरणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एक समर्पित वेब पोर्टल विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 10 वर्षाहून अधिक दावा न केलेल्या ठेवीची रक्कम व बेवारस पडून असलेली रक्कम ही जवळपास 35,0 00 कोटी रुपयांहून अधिक असून, रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवली आहे.
देशभरातील बँकांमध्ये, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ,पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा आदींच्या अनुक्रमे 8086 कोटी रुपये रक्कम, 5340 कोटी रुपये रक्कम, 4558 कोटी रुपये रक्कम, 3904 कोटी रुपये रक्कम ही बेवारस व दावा न केलेल्या ठेवींची रक्कम असुन, रिझर्व्ह बँकेकडून जमा झाली आहे.