जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
महाराष्ट्र राज्यात जागतिक आरोग्य दिनानिमित्त ,आज पासून आठवडाभर ," सुंदर माझा दवाखाना " हा उपक्रम चालू होत असून, सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य विषयक सेवा देऊन, कर्मचाऱ्यांनी गुणवत्ता पूर्ण आरोग्यसेवा द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केले आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत असलेल्या आरोग्यविषयक आव्हानांना,डॉक्टर्स ,नर्स ,आरोग्य कर्मचारी यांनी मोठ्या ताकतीने सामोरे जावे. आजच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी जनतेला निरोगी, सदृढ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात आरोग्यविषयक विविध सेवा योजना, विविध उपक्रम, विविध शिबिरे, आरोग्य सल्ला मोहीम याद्वारे राबवली जात असून, सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू ठेवून, आरोग्यविषयक समस्यांचा सामना केला जात आहे, असे त्यांनी बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्यातील आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी व संलग्नित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मानले.