जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी )
भारतातील महाराष्ट्रामध्ये, प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन मोठे होत असून, त्यानंतर गुजरात व राजस्थानमध्ये कांद्याचे उत्पादन होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही कांद्याचे उत्पादन,वरील राज्यांमध्ये घेतले गेले आहे. देशभरातील कांद्याच्या बाजारपेठेत ,सध्या कांद्याची आवक फार मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने ,दरात फार मोठी घसरण होऊन, शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. याशिवाय देशातील विविध भागात अवकाळी व गारपीट झाले असल्याने ,मोठा फटका शेतीच्या पिकांना बसला आहे. यात प्रामुख्याने कांद्याच्या शेतीचाही नुकसानीचा आकडा मोठा आहे. सध्याच्या परिस्थितीत हवामानातील आद्रता वाढली असल्याने, कांदा खराब होत आहे , याचाही परिणाम कांद्याच्या दरावर होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या देशभरातील बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून पिकवला गेलेला कांदा हा, निम्म्या भावाने विकत घेतला जात आहे. देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याची दराच्या घसरणीमागे मुख्य कारण म्हणजे, सध्या होत असलेला अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे कांदा खराब होऊ नये म्हणून सध्या बाजारपेठेत, कांद्याची फार मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. याचा परिणाम निश्चितच कांद्याच्या दरांवर झाला आहे. देशातील एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्र हा 43% कांदा उत्पादक राज्य असून, त्यानंतर मध्यप्रदेश चा वाटा १६ टक्के व कर्नाटकचा व गुजरातचा वाटा अनुक्रमे प्रत्येकी नऊ टक्के आहे. दरम्यान खरीप हंगामा, खरीप हंगाम संपताना व रब्बी हंगामात कांद्याचे जवळपास 3 वेळा पीक घेतले जाते. त्यामुळे देशात सर्वत्र ताज्या कांद्याचा नियमित पुरवठा होत असतो. सध्याच्या हवामान परिस्थितीच्या मुळे ,साठवलेला कांदा व पेरणी केलेला कांदा या दोन्हीमध्ये नुकसान होत असल्याने ,कांदा उत्पादक शेतकरी, तात्काल कांदा काढून बाजारपेठेत आणत आहे. त्यामुळे कांद्याची बाजारपेठेतील आवक क्षमता वाढली आहे. या सर्वच गोष्टींचा परिणाम कांद्याच्या दरात घसरणीत रूपांतर होत आहे.