जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )महाराष्ट्र राज्यातील एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठीच्या सीईटी ऑनलाईन परीक्षेच्या वेळी, तांत्रिक समस्येमुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांना ,पुन्हा फेरपरीक्षा देता येणार असल्याची माहिती सीईटी सेलने केली आहे. त्यासाठी 11 एप्रिल पर्यंत अर्ज करून, 27 एप्रिल रोजी पुन्हा परीक्षा देता येणार असल्याची माहिती सीईटी सेल केली आहे .
यापूर्वी झालेल्या राज्यातील एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी सीईटीच्या परीक्षेत ,तांत्रिक समस्येमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत फार मोठी अडचण निर्माण झाली होती. राज्यातील विविध भागातील एम. बी. ए. च्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना, ऑनलाइन परीक्षा देताना तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. विशेषतः नाशिक येथील सीईटी परीक्षा केंद्रावर, 40 मिनिटे अगोदरच ऑनलाइन पेपर सबमिशन बंद झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांना पेपर जमा करता आले नव्हते .शिवाय इतरही केंद्रावर काही ठिकाणी ऑनलाइन परीक्षेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. या सर्व गोष्टींचा विचार करून, सीईटी सेल मार्फत 27 एप्रिल ला पुन्हा ऑनलाईन परीक्षा घेऊन, विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे नियोजन पूर्ण केले आहे. त्यासाठी 11 एप्रिल पर्यंत अर्ज करावेत अशी सूचना सीईटी सेलने केली आहे.