जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दि. 21 जून रोजी, 6 दिवसांच्या अमेरिका इजिप्त दौऱ्यावर रवाना होणार आहेत. दरम्यान अमेरिका दौऱ्यात दि. 21 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे,संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात, न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असून, अमेरिकन राजकर्ते, प्रमुख नागरीक आणि भारतीय नागरिक देखील त्यांचे भव्य स्वागत करणार आहेत.दरम्यान अमेरिकन काँग्रेसचे सदस्य अमी बेरा यांनी म्हटले आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट ही सद्य परिस्थितीत भूराजकीय आव्हान आणि भारत आर्थिक शक्ती उदयास येत असल्याने, अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे भारत -अमेरिका द्विपक्षीय व्यापार संबंधावर फार मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी असल्याचेही अमेरिकन काँग्रेसचे सदस्य अमी बेरा यांनी म्हटले आहे. दरम्यान ओहायोचे सिनेटर शेरोड ब्राऊन यांनी सांगितले आहे की, भारतीय- अमेरिकन समुदाय जो सध्या ओहायो मध्ये असून, दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दरम्यान अमेरिका व इजिप्त्याच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे, संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. शिवाय अमेरिका आणि इजिप्त यांचेबरोबर सध्याची जागतिक परिस्थिती पाहता, संबंध अधिक बळकट व दृढ होण्याचे संकेत मिळत आहेत.