जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
भारताचे सूर्याचा अभ्यास करणारे आदित्य एल-1 हे यान, 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीहरीकोटा येथून सकाळी 11वाजून 50 मिनिटांनी,अवकाशात झेपवणार आहे.भारताच्या अवकाश संशोधन संस्थेचे( इस्रो), महत्त्वाकांशी सूर्याच्या अभ्यास करण्याच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित झाले असून,श्रीहरीकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल-1 यानाचे प्रक्षेपण केले जाणार आहे.पृथ्वीपासून जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास आदित्य एल-1 हे यान करणार असून, पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतराच्या जवळपास 4 पटीने जास्त अंतर आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी झेपावणारे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे आदित्य एल-1 हे यान, पहिल्यांदाच सूर्याच्या वातावरणाचा,सूर्याच्या गतीचा, उष्णतेचा ओझोनच्या थरावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करणार आहे.
भारतीय अवकाश संस्थाच्या (इस्रो) आदित्य एल-1 यांनाचा पृथ्वीच्या कक्षेपासूनचा सूर्याच्या अलीकडे निश्चित केलेल्या एल-1 स्थानापर्यंतचा प्रवास काळ हा, जवळपास 127 दिवसाचा असून,सूर्यासाठी खास वैशिष्ट्यपूर्ण खगोलशास्त्रीय अभ्यासात्मक बऱ्याच गोष्टींचे रहस्य उलगडण्यात यश येणार असल्याची माहिती भारतीय अवकाश संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.एकंदरीतच भारतीय अवकाश संस्थेच्या (इस्रो) शनिवारी 2 सप्टेंबर 2023 रोजी, श्रीहरीकोटा येथून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी झेपावणाऱ्या आदित्य एल-1 यानाच्या प्रक्षेपणाकडे, संपूर्ण विश्वाचे व विश्वातील अवकाश संशोधन शास्त्रज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.