सांगलीत साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्यमहोत्सवी सोहळा, 300 सन्माननीय मान्यवरांची उपस्थिती. ---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत आज साप्ताहिक सनातन प्रभात चा रोप्यमहोत्सवी सोहळा संपन्न झाला असून, या सोहळ्यासाठी 300 मान्यवरांची उपस्थिती लाभली. राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे सनातन प्रभात होय! - अधिवक्ता समीर पटवर्धन. 

मिरज - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेच आपण हिंदू आहोत हे आपण प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.कोणत्याही प्रकारचा विशेष पाठिंबा अथवा आर्थिक पाठबळ नसतांना सतत 25 वर्षे एखादे वृत्तपत्र चालवणे ही अविश्‍वसनीय गोष्ट आहे. सनातन प्रभात हे धर्मभक्ती आणि राष्ट्रभक्ती जाज्वल्यपणे शिकवते. सनातन प्रभातचे वाचक हे केवळ वाचक नसून ते भगवंताशी जोडलेले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्यरत असणारे एकमेव वृत्तपत्र म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय, असे गौरवोद्गार अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी काढले.ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात वक्ता म्हणून बोलत होते. हा सोहळा मिरज शहरातील बाह्मणपुरी येथील ‘आळतेकर हॉल’ येथे 20 ऑगस्टला पार पडला. या प्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’चे श्री. राहुल कदम आणि सनातन संस्थेच्या श्रीमती मधुरा तोफखाने यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि सनातनच्या संत पू. रत्नामाला दळवी यांची वंदनीय उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी 300 जणांची उपस्थिती होती. 

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ‘सनातन प्रभात’ने नेहमीच वैचारिक योद्ध्याची भूमिका बजावली ! - राहुल कदम, सनातन प्रभात. 

या प्रसंगी श्री. राहुल कदम म्हणाले, ‘‘हिंदुत्व विचारांचे नियतकालिक चालवणे, ही किती कठीण गोष्ट आहे, याची आपण कल्पना करू शकतो. हे शिवधनुष्य उचलण्याचे सर्वस्वी श्रेय जाते, ते सनातन संस्थेचे संस्थापक तथा ’‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूहा’चे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ! वर्ष 1998 मध्ये त्यांनीच ’‘सनातन प्रभात’’ची मुहूहूर्तमेढ रोवली. आज त्यांच्याच कृपाशीर्वादाने मराठी भाषेतील ’दैनिक ‘सनातन प्रभात’’च्या 4 आवृत्त्या, मराठी आणि कन्नड भाषांतील ’साप्ताहिक ‘सनातन प्रभात’’तर इंग्रजी अन् हिंदी भाषांतील ’पाक्षिक ‘सनातन प्रभात’’असा ’‘सनातन प्रभात’’ नियतकालिकांचा विस्तार झाला आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे स्वतः या नियतकालिक समूहाचे संपादक होते. एवढ्या उच्च कोटीचे संत एखाद्या नियतकालिक समूहाचे संपादक असणे, ही वृत्तपत्राच्या इतिहासातील एकमेव घटना असावी.हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ‘सनातन प्रभात’ने नेहमीच वैचारिक योद्ध्याची भूमिका बजावली आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदुहिताच्या आंदोलनांना ‘सनातन प्रभात’कडून वैचारिक बळ पुरवले जाते.

असा झाला सनातन प्रभातचा सोहळा. 

प्रारंभी वेदमंत्रपठण झाल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर ‘सनातन प्रभात’साठी वितरक म्हणून सेवा करणार्‍या विविध वितरकांचा सत्कार करण्यात आला. या नंतर ‘सनातन प्रभात’चे विविध वाचक यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत चव्हाण यांनी केले. श्‍लोक म्हणून सोहळ्याची सांगता झाली.

उपस्थित मान्यवर - 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, गोरक्षक श्री.विनायक माईणकर, दत्तभक्त श्री. चंद्रशेखर कोडोलीकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. श्रीकृष्ण माळी, श्री. सचिन पवार, जयसिंगपूर येथील अधिवक्ता प्रसाद काळे यांसह धारकरी, वाचक, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top