जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने कोल्हापूर ते पुणे एसटी प्रवासासाठी, 8 ई शिवाई बस उपलब्ध केल्या आहेत. या 8 ई शिवाई बस गाड्या पैकी, कोल्हापूर आगारासाठी 4 बस गाड्या व पुणे स्वारगेट आगारासाठी 4 बस गाड्या अशा उपलब्ध झाल्या आहेत. कोल्हापुरातून पुण्यासाठी एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ई शिवाई बस शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या असून,एसटी प्रवाशांचा याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे .दरम्यान महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने 5000 ई शिवाई बस घेण्याचे निश्चित केले असून, ई शिवाई बस म्हणून नामनिधान केले आहे.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाकडून,ई शिवाई बसचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार असून,राज्यातील पहिली ई बस सेवा पुणे- अहमदनगर मार्गावर चालू केली होती. शिवाय पुण्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या शहरात चालू केली होती. आता महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने पुण्यातून -मुंबई ,पुण्यातून- नाशिक, पुण्यातून- छत्रपती संभाजीनगर या मार्गावर ई शिवाई बस, शिवनेरी बस गाड्या सुरू केल्या आहेत.या बस गाड्यांना देखील एसटी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.पुणे- कोल्हापूर व कोल्हापूर - पुणे दरम्यान 8 ही ई शिवाई बस शुक्रवारपासून सुरू झाल्या असून, दिवसभरात ई शिवाई बसच्या 20 फेऱ्या होणार आहेत.
पुणे स्वारगेट पासून निघणाऱ्या गाड्या सकाळी- 5:00, 5:30, 6:30, 9:00, 9:30, 10:30 वाजता ,दुपारी-1:30, 2:30, 3:30, व सायंकाळी-7:30 वाजता सुटणार आहेत.
कोल्हापूर पासून सकाळी-5:00, 5:30, 6:30, 9:00, 9:30, 10:30, दुपारीदुपारी-1:30, 2:30, 3:30, व सायंकाळी-7:30 वाजता सुटणार आहेत.