जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारताने काल ऑस्ट्रेलिया विरुद्धचा अखेरचा वन- डे सामना गमावून 3 वनडे च्या मालिकेमध्ये,2:1 असा विजय मिळवला आहे. काल राजकोट येथे खेळवल्या गेलेल्या वनडे सामन्यात, भारताचा 66 धावांनी पराभव झाला आहे.ऑस्ट्रेलियन संघाने 3 वनडे मालिकेत, 2 वनडे सामन्यात पराभव स्वीकारून, शेवटच्या अंतिम सामन्यात शेवट गोड केला आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून,7 विकेटच्या बदल्यात 352 धावांचा डोंगर रचला होता.त्यानंतर खेळावयास आलेल्या भारतीय संघाला 286 घावांत पूर्ण संघाला रोखून,अखेरचा सामना जिंकून शेवट गोड केला आहे.ऑस्ट्रेलियन संघाने 352 धावांचा डोंगर उभारून,भारतासमोर जोरदारपणे आव्हान उभे केले होते.भारताने फलंदाजी सुरुवात करून,सुरुवातीस रोहित शर्मा व वॉशिंग्टन सुंदर यांनी फलंदाजी आकार देऊन,जवळपास 10 षटकात 74 धावांची सलामी दिली.त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर 18 धावांवर असताना बाद झाला व नंतर आलेल्या फलंदाजांनीही संघाची धावसंख्या वाढवली,परंतु 144 धाव संख्या असताना,रोहित शर्मा बाद झाला.रोहित शर्मा ने 6 षटकार व 5 चौकारांसह 81 धावांची खेळी करून,संघास योगदान दिले आहे.
त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने अय्यर बरोबर फलंदाजीस आकार देण्याचा प्रयत्न केला,परंतु अर्धशतकानंतर जवळपास 56 धावांवर विराट कोहली बाद झाला.विराट कोहलीने 1 षटकार व 5 चौकारांच्या साह्याने अर्धशतक ठोकले आहे. श्रेयस अय्यर यांनी 48 धावा मध्ये 1 चौकार व 2 षटकार मारले असून, ऑस्ट्रेलियन गोलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने,भारताच्या 4 ही फलंदाजांना परत तंबूमध्ये धाडले.यानंतर रवींद्र जडेजा याचे 35 धावांचे योगदान झाले आहे. एकंदरीतच अशा रीतीने भारताने 3 वन डे च्या मालिकेत 2:1 अशी मालिका जिंकली आहे.