जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
शेकडो वर्ष वंचित राहिलेल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी,सांगलीतील महामेळाव्यात सहभागी व्हा असे,माजी मंत्री जयंत पाटील यांनी आवाहन करून,माजी महापौर विवेक कांबळे यांच्या घरी पाटील यांनी सदिच्छा भेट देत मेळाव्यास पाठिंबा दिला आहे.
अनुसूचित जाती आणि जमाती मधील बांधव शेकडो वर्ष मूलभूत सुविधा आणि सवलती पासून आजही उपेक्षित आहेत,त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगलीमध्ये 30 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या अनुसूचित जाती जमाती महापरिवर्तन मेळाव्यात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सांगलीचे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष आणि माजी महापौर विवेक कांबळे यांच्या मिरजेतील घरी,माजी मंत्री जयंत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.अनेक वर्ष वंचित राहिलेल्या समाजाचे संघटन करून,त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विवेक कांबळे यांनी सुरू केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे गौरव उद्गार यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी मा.नगरसेवक वीरेंद्र थोरात,सचिव रवींद्र कांबळे, उपाध्यक्ष सतीश मोहिते, सचिव अशोक कांबळे, सचिव श्वेतपद्म कांबळे, मिलिंद मेटकरी, डॉ.रवीकुमार गवई,पोपटराव कांबळे,योगेंद्र कांबळे,अनिल साबळे,गंगाधर कुरणे,सुमित कांबळे,प्रज्वल कांबळे यांच्या सहीत अन्य मान्यवर उपस्थित होते.