जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मध्य रेल्वेच्या झोन मध्ये परत एकदा,सांगली रेल्वे स्टेशन 2023 च्या स्वच्छता अभियानामध्ये,सर्वोत्कृष्ट स्वच्छ रेल्वे स्टेशन ठरले असून,स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थानी पोहोचले आहे.मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 2023 च्या स्वच्छता अभियानाच्या यादीमध्ये,वाठार,सांगली,दादर,मानखुर्द आदी रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.
सांगलीतील नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर व इतर रेल्वे प्रवासी संघटनांनी वारंवार याबाबतीत जागृती करून,रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतेबाबतीत व रेल्वे प्रवाशांच्या अडचणी बाबतीत आवाज उठवला आहे.आज मध्य रेल्वेच्या झोनने जाहीर केलेल्या निर्णयानुसार,सर्वोत्कृष्ट स्वच्छ स्टेशनच्या यादीत,सांगली रेल्वे स्टेशन अव्वल क्रमांकावर आले आहे.सांगली रेल्वे स्टेशनच्या बाबतीत रेल्वे प्रवाशांच्या अडचणी विषयी,नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखरकर यांनी वारंवार स्थानिक रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून,स्वच्छतेच्या बाबतीत व रेल्वे प्रवाशांच्या अडचणी बाबतीत निवेदने देऊन, आंदोलने करून,सांगली रेल्वे स्टेशन सुधारण्याचे बाबतीत तसेच महाराष्ट्र राज्याबाहेर जाणाऱ्या रेल्वे गाड्या बाबतीत, सांगली रेल्वे स्टेशनला थांबा मिळवून देण्यास विशेषत्व करून प्रयत्न केले आहेत.
