जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशाच्या लोकसभेने आज अखेर 128 व्या घटनादुरुस्तीद्वारे 33% महिलासाठी आरक्षणाचे प्रावधान असलेल्या, "नारीशक्ती वंदन विधेयक 2023" ला मंजुरी देण्यात आली असून, हा एक प्रकारे देशाच्या संसदीय लोकशाहीच्या प्रणालीत नारी शक्तीचा उदय असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ठरवल्यानुसार," नारीशक्ती वंदन विधेयक 2023" लोकसभेत आज सादर केले होते. लोकसभेतील चर्चेनंतर झालेल्या मतदानात," नारीशक्ती वंदन विधेयक 2023" या विधेयकाच्या बाजूने 454 मते पडून, 2/3 बहुमताने विधेयक पास झाले.आज लोकसभेत केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी,गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर "नारी शक्ती वंदन विधेयक 2023" लोकसभेत मांडले होते.आज लोकसभेत सकाळी 11:00 वाजले पासून जवळपास सायंकाळी 7:00 वाजेपर्यंत,विधेयकावर चर्चा होऊन,अखेर दोन तृतीयांश बहुमताने 454 मते पडून,विधेयक पास झाले.देशाच्या लोकशाहीच्या संसदीय प्रणालीत आता नारीशक्तीचा उदय झाला असल्यामुळे,हा एक प्रकारे नारीशक्तीचा विजय आहे. केंद्र सरकारमध्ये महिलांचा सहभाग ही मोदी सरकारची मोठी ताकद असून,महिला आरक्षण विधेयकामुळे एक नवे पर्व सुरू झाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
दरम्यान केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या काही केलेल्या विधानामुळे,विरोधी पक्षांमध्ये व सत्तारूढ पक्षांमध्ये शाब्दिक चकमक लोकसभेत आज बघावयास मिळाली. खासदार ओवेसी यांनी "नारीशक्ती वंदन विधेयक 2023" मध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या,परंतु दुरुस्तीवर मतविभाजन झाल्यानंतर,त्या पास होऊ शकल्या नाहीत.आता देशाच्या संसदीय लोकशाहीच्या प्रणालीत, "नारीशक्ती वंदन विधेयक 2023"अंमलात येण्यासाठी 2029 साल उजाडेल असे वाटते.

