जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध अन्वेषण विभागाकडून, संशयित आरोपीची शोध मोहीम जारी केली असता,दि. 20/ 9/ 2023 रोजी बाबासाहेब ढाकणे व रवी आंबेकर या बातमीदाराकडून ताराबाई पार्क येथे एक इसम,मोटरसायकल विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता,शाहूपुरी पोलीस ठाण्यातील डीबी स्टाफने सापळा लावला असता,संशयीत एक इसम मोटारसायकलीसह मिळून आला व त्या संशयित इसमाकडे चौकशी केली असता सुरुवातीस,उडवा उडवीची उत्तरे दिली गेली होती परंतु पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चौकशीअंती समीर युनूस मनेर, वय 34, राहणार महालक्ष्मी नगर,कदमवाडी,कोल्हापूर असल्याचे समजले असून,मोटर सायकल चोरीचा गुन्हा कबूल केला आहे व चोरीस गेलेली मोटरसायकल रुपये 25000/- असा मुद्देमाल संशयित इसम समीर युनूस मनेर याचे कडून जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांचे सूचनेप्रमाणे,पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली,पीएसआय प्रमोद चव्हाण,सहाय्यक फौजदार संदीप जाधव,पोलीस अमलदार संजय जाधव,मिलिंद बांगर,विकास चौगुले,शुभम सपकाळ,लखन पाटील,बाबासाहेब ढाकणे,रवी अंबेकर,महेश पाटील यांनी कारवाईत भाग घेतला असून,तपास चालू आहे.