जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील एकीकडे गणेशोत्सव साजरा होत असताना,शेतकरी वर्गासाठी एक आनंदाची बातमी,भारतीय हवामान खात्याने दिली असून,राज्यात सर्वत्र ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात वर्तवण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे,बळीराजा सुखावणारा असून,सध्याच्या परिस्थिती खरीप हंगामातील पिकांना हा फार मोठा दिलासा मिळू शकतो.
महाराष्ट्र राज्यातील धरणांच्या देखील पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते.परिणामी राज्यावरील पाणी संकट दूर होण्याची शक्यता आहे.सद्य परिस्थितीत पश्चिम बंगालमधील उपसागरामध्ये, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे,राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,सध्याचे वातावरण पावसासाठी पोषक असे झाले आहे.महाराष्ट्र राज्यात भारतीय हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून,यामध्ये नंदुरबार,वर्धा,संभाजीनगर, जालना,नागपूर,कोकण,मध्य महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भातील काही जिल्हे,कोकण,पुणे,मुंबई,ठाणे,आदी ठिकाणी चांगला पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली आहे.महाराष्ट्र राज्यात एकीकडे अद्यापही काही भागात,शेतकरी वर्ग पावसाकडे लक्ष लावून बसला आहे.त्यामुळे राज्यात शेतकरी वर्गाला दमदार पावसाची अपेक्षा आहे.भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाने शेतकरी वर्ग सुखावला आहे.