जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मोहालीतील एक दिवसीय सामन्यात भारताने काल, ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट राखून,दणदणीत विजय मिळवला आहे.सुरुवातीस ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करून 277 धावांचा डोंगर उभारून,भारतासमोर आव्हान उभे केले होते.परंतु भारताने लिलया 8 चेंडू व 5 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला आहे.शुभमन गिल,ऋतुराज गायकवाड,सूर्यकुमार यादव व कर्णधार के.एल राहुल यांची अर्थशतके सामन्यास विजयी करण्यास सार्थ ठरली. भारताने आता 3 एक दिवशीय सामन्यामधल्या मालिकेत,1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने 277 धावांचा पाठलाग करताना दणक्यात सुरुवात करून, शुभमन गिल व ऋतुराज गायकवाड यांनी 142 भावांची दमदार सुरुवात करून,ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.जवळपास दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली. नंतर ऑस्ट्रेलियाच्या एडम जंम्पा या गोलंदाजाने ऋतुराज गायकवाड याला बाद करून तंबूत पाठवले.ऋतुराज गायकवाड यांनी 77 चेंडू 71 धावांची खेळी केली असून, त्यामध्ये 10 चौकारांचा समावेश आहे.ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जंम्पा याने शुभमन गिल याला नंतर बाद करून तंबूत पाठवले. त्याने 63 चेंडू 74 धावांची खेळी करून,6 चौकार व 2 षटकार मारले. त्यानंतर भारताने 10 धावांत सलग 3 विकेट गमवल्यामुळे संघ अडचणीत सापडला होता,परंतु ईशान किशन व के .एल राहुल. यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.शेवटी ईशान किशन याला 18 धावावर कमिंन्सने बाद केले. त्यानंतर आलेल्या फलंदाज के.एल.राहुल व सूर्या यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेतला.भारताच्या फलंदाजीच्या धावास आकार देत,सूर्या याने अर्धशतक ठोकले. त्यामध्ये 5 चौकार व 1 षटकारांचा समावेश आहे.त्याबरोबरच के.एल.राहुल यांनी व सूर्या यांनी सुद्धा 80 धावांची भागीदारी केली,शेवटी सूर्या बाद झाल्यानंतर,के.एल.राहुल ने 63 चेंडू 58 धावांची खेळी करून ,1 षटकार व 4 चौकार मारले.अशा रीतीने भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून एक दिवसीय 3 सामन्यांच्या मालिकेत,1-0 अशी आघाडी घेतली आहे.