जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात बहुतेक ठिकाणी पुढील 4 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता,भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.सध्या झारखंड राज्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून,ते सध्या चक्रीय स्थितीमध्ये आहे.शिवाय विदर्भ ते मराठवाड्यापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पुढील 48 तास कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज, भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला आहे.महाराष्ट्र राज्यातील विशेषतः रायगड,भंडारा, नागपूर,गोंदिया भागात व परिसरात 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी,विजांच्या कडकडाटासह देखील पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यात,कोकणात,मराठवाड्यात काही ठिकाणी दि. 24 सप्टेंबर 2023 ते दि.26 सप्टेंबर 2023 पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 25 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत, राज्याच्या संपूर्ण भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. राज्यातील पुणे विभागात हवामान विशेषता ढगाळ राहून,हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.राज्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार वृष्टी होण्याची शक्यता,हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे.राज्यातील पुण्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून,सांगली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सांगलीत काल बऱ्याच ठिकाणी पावसामुळे पाणीच पाणी झाले होते.एकंदरीत बळीराजासाठी भारतीय हवामान खात्याने दिलेली वार्ता सुखावह ठरणार आहे.