जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(प्रतिनिधी: अनिल जोशी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार मिरज तालुका काँग्रेस च्या वतीने,दि.8 सप्टेंबर रोजी जिल्याचे नेते माजी मंत्री आमदार मा.विश्वजीत कदम,मा.विशाल (दादा) पाटील, मा.आमदार विक्रम (दादा) सावंत, मा.पृथ्वीराज पाटील (बाबा), मा.जयश्रीताई मदन (भाऊ) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जनसंवाद पदयात्रा निघणार आहे.
त्याची सुरुवात सकाळच्या सत्रा मध्ये मिरज तालुक्यातील बेळंकी येथून ठीक सकाळी 6:00 वाजता सुरवात होणार असून,शेवट एरंडोली दुपारी ठीक 12:00 वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे.दुपाराच्या सत्रा मध्ये मालगाव येथून दुपारी ठीक 4 :00 वाजता सुरवात होऊन,शेवट मिरज येथे ठीक रात्री 8 :00वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे .
तरी तालुक्यातील सर्व फ्रंटल संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ,काँग्रेस प्रेमी ज्या भागातुन पदयात्रा निघणार आहे,त्या भागातील गावातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती मिरज तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे.