जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
साताऱ्यात आज पुणे- बेंगलोर महामार्गावर,पारगाव खंडाळा नजीक धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.त्यामुळे पुणे -बेंगलोर महामार्गावरील वाहतूक,काही काळ बंद होऊन,पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.आज साताऱ्यातील झालेल्या धनगर समाजाच्या वतीने,आरक्षण मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात,मेंढरे -घोडे व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुरुवातीस साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून मोर्चा,तहसील कार्यालय खंडाळापासून पुणे-बेंगलोर महामार्गावर दाखल झाला.त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन," आरक्षण आमच्या हक्काचे नाही,कुणाच्या बापाचे","येळकोट येळकोट जय मल्हार","कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही"अशा घोषणानी परिसर दुमदुमून जाऊन रस्ता रोको करण्यात आले.अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करून,मेंढपाळावर होणाऱ्या हल्ल्यावर सुरक्षा उपाययोजना करावी,मेंढ्यांना करण्यासाठी वने राखीव ठेवावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

साताऱ्यातील आज झालेल्या पुणे-बेंगलोर महामार्गावर,धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलनात,धनगर बांधवांनी गजी नृत्यही सादर केले होते.आजचा साताऱ्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील धनगर समाजाच्या वतीने,आरक्षणाच्या मागणीसाठी केलेले रस्ता रोको आंदोलन,पूर्णपणे यशस्वी झाले आहे.