जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कोल्हापुरात आज कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी व अधिक परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घालणाऱ्या ए.एस.ट्रेडर्स चा मुख्य सूत्रधार संशयित लोहितसिंग सुभेदार यास अटक करण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. गेले अनेक महिने ए.एस. ट्रेडर्स चा मुख्य सूत्रधार संशयीत लोहितसिंग सुभेदार हा पोलिसांना गुंगारा देत होता, शिवाय पोलीस त्याच्या शोधासाठी गेले कित्येक महिने व पकडण्यासाठी मार्गावर होते.दरम्यान कोल्हापुरातील एका गणपतीच्या दर्शनासाठी,संशयित लोहितसिंग सुभेदार येत असल्याची खबर पोलिसांना मिळताच, कोल्हापूर पोलिसांनी सापळा रचून त्यास अटक केली आहे.ए.एस.ट्रेडर्स च्या माध्यमातून अनेक ग्राहकांना ज्यादा परताव्याची खोटी आमिषे दाखवून,कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती. दरम्यान याप्रकरणी कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये, नोव्हेंबर 2022 मध्ये, ए.एस.ट्रेडर्स च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचप्रमाणे तत्कालीन तपास अधिकारी यांनी संशयित आरोपी विक्रम काळे यास अटक केली होती.दरम्यान मार्च 2023 मध्ये अनेक नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारी कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर, गुन्ह्याची व्याप्ती पाहून गुन्हा,आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.यापूर्वी 4 चार चाकी वाहन,3 दुचाकी गाड्या व काही जमीन जप्त करण्यात आली होती. या संपूर्ण फसवणूक प्रकरणाचा ए.एस.ट्रेडर्स मुख्य सूत्रधार संशयित लोहितसिंग सुभेदार यांच्यापर्यंत पोहोचून,पोलिसांना अटक करण्यात यश येत नव्हते.
आज गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली असता, कोल्हापुरातील एका गणपतीवर श्रद्धा असल्याने, तो येत असल्याचे समजले होते. खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोल्हापुरातील किणी टोल नाका जवळ सापळा रचून,सदर संशयित आरोपी लोहितसिंग सुभेदार यास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती गायकवाड यांच्या तपासाखाली चालू असून,ए .एस. ट्रेडर्स चा मुख्य सूत्रधार संशयीत लोहितसिंग सुभेदार यास अटक झाल्याने,संस्थाचालकांचे व एजंटांचे धाबे दणाणले आहेत.