जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस पडत असल्याने,पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस मोठ्या प्रमाणात चालू असून,सकाळी 8:00 वाजता, कोयना धरणात 92.38 तर वारणा धरणात 34.40 पाणीसाठा झाला आहे.वारणा धरणाची पाण्याची क्षमता जवळपास 34.40 टीएमसी असून, धरण 100% भरल्याचे जलसंपदा विभागाच्या माहिती द्वारे स्पष्ट झाले आहे.कोयना धरणाची पाणी क्षमता जवळपास 105.25 टीएमसी असून, त्यापैकी कोयना धरणात सध्या परिस्थितीत 92.38 पाणीसाठा झाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रमुख धरणातील सद्यस्थितीतील पाणी साठा व साठवणूक क्षमता खाली दिली आहे.
कोयना 92.38 (105.25), राधानगरी 8.30 (8.36), वारणा 34.40 (34.40) कन्हेर 8.22 (10.10), धोम 10.16(13.50), अलमट्टी 108.19 (123), तुळशी 2.97(3.47), उरमोडी 5.65 (9.97), तारळी 5.54 (5.85).
सध्या परिस्थिती कालव्याद्वारे व विद्युतगृहाद्वारे धरणातून होत असलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये.-
वारणा 1500,धोम 919,अलमट्टी 10000,राधानगरी 1400, कन्हेर 680.