जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील आजची श्री गणेश विसर्जन मिरवणूक ही लक्षवेधी ठरणार असून,यामध्ये चांद्रयान,सूर्ययान याच्या देखाव्यासह ढोल पथके,ताशा पथके,बँड पथकांचा समावेश असून,सर्वच मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीची अंतिम तयारी चालू आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्थेने,अवकाश संशोधनातील इतिहासात विक्रम केलेल्या चांद्रयान व सूर्य यानाच्या देखाव्याचा,मिरवणुकीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल पथके,ताशा पथके,बँड पथके,पारंपारिक वाद्ये,लेझर शो, डीजे सुद्धा असणार आहे.शिवाय धनगरी ढोलही वाजणार आहेत.कोल्हापुरातील विशेषतः विसर्जनाची मिरवणूक म्हटले की,तालमींच्या विसर्जन मिरवणुकीवर,शहर प्रेमीयांचे कायमच लक्ष असते.शिवाय सर्वच मंडळाकडून विशेषतःतालीम मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील सार्वजनिक सर्व गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन,इराणी खणीमध्ये होणार असल्याची स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या असून,कोल्हापूर महानगरपालिकेसही तशा सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोल्हापुरातील सर्व रस्त्याच्या मिरवणुक जवळपास 66 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून,मिरवणुकीस मध्यरात्री 12:00 पर्यंत वाद्यांना वाजवण्यास परवानगी दिलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत रात्री 12:00 नंतर वाद्ये वाजवल्यास, नियमाचे उल्लंघन केल्यास,गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस प्रशासनाने दिला आहे.. यापूर्वीच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी, पहिल्या,आठव्या,नवव्या,दहाव्या दिवसासाठी वाद्ये वाजवण्यासाठी नियमावली जारी केली आहे.