आरोग्य भाग- 8.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
१.) जीवनशैली मुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका संभवतो.कोलेस्टेरॉल वाढल्याने ह्रदय विकार उद्भवू शकतात. जिरे दररोज सातत्याने सेवन केले तर कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
२.)वजन कमी करण्यासाठी आजकाल अनेक डाएट केले जातात. जिरे गरम पाण्यात उकळून त्याचे दररोज सकाळी अनाशापोटी सेवन केले तर वजन कमी होते असे सिद्ध झाले आहे.
३.)मुळव्याधीवरही जिरे हा रामबाण उपाय आहे. जिरे,सैंधव मीठ आणि ताक एकत्र करून पिल्यास मुळव्याधीपासून आराम मिळतो.
४.)सांधेदुखी चा त्रास हा अत्यंत त्रासदायक असतो. सांधेदुखीवरही जिरे इलाज करू शकतात.जिरे,मेथ्या,ओवा, बडीशेप इत्यादि घटकांना बारीक वाटून हे चूर्ण दररोज खाल्ले तर सांधेदुखी वर आराम मिळतो.
५.)बदधकोष्ठतेमुळे बैचेन झाल्यासारखे होते व यावर मात्रा म्हणून ताक,सैंधव मीठ आणि जिरे पावडर एकत्र करुन त्याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
६.)उलटी किंवा मळमळ होत असेल तर जिरे चावून खावे.जिरे चावून खाल्ल्याने त्याच्या रसामुळे उलटी व मळमळ थांबते.
७.)जिरे हे पित्तशामक आहे त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी जिरे व धन्याची पूड खडीसाखर सोबत सेवन केल्यास करपट ढेकर येणे,छातीत जळजळ होणे ही लक्षणे दूर केली जाऊ शकतात.
८.)काही व्यक्तींना सर्वच हंगामात सर्दी चात्रास होतो.सर्दीचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा जिरे प्रभावी उपाय आहे.जिरे थोडेसे भाजून ते रूमालात बांधून त्याची पोटली तयार करून ती नाकाने हुंगावी यामुळे काही काळानंतर सर्दीचा त्रास कमी होतो.
९.)सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पोट फुगणे,गँसेस या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे आढळून येते.यावर उपाय म्हणून जिरे,लिंबू आणि सैंधव मीठ यांचे मिश्रण मुरवून ते सेवन करावे.
१०.)उचकी लागल्यावर तूप,जिरे आणि.लिंबू यांचे मिश्रण एकत्र घेतल्यास उचकी थांबते.
११.)जिरे हे तापशामक व उष्णताशामक आहे.सातत्याने तापाची कणकण येत असेल तर खूप पूर्वीपासून जिरे वापरले जाते. जिरे आणि जुना गूळ एकत्र करून त्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या करून या गोळ्यांचे एकवीस दिवस रोज सकाळ संध्याकाळ सेवन केले तर तापाची कणकण दूर होऊ शकते. याखेरीज जिरे पावडर आणि दूधाचे मिश्रण पिण्याचाही सल्ला ताप आल्यावर दिला जातो.उष्णतेमुळे ओठ किंवा तोंडावर जर आल्याचे दिसून येते.अशावेळी उष्णता शामक जिरे वाटून त्याचा लेप जर आलेल्या ठिकाणी लावावा.
१२.)पचनसंस्थेशी निगडित निरनिराळ्या विकारांवर जिरे खूप प्रभावी ठरते. जि-यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीआँक्सिडंट असतात ज्यामुळे चयपचयाच्या कार्यात मोठी भूमिका बजावणा-या आतड्यांना निरोगी राखले जाते व परिणामी पचनक्रिया नीट पार पाडली जाते.पोटाशी निगडीत अजून एक समस्या म्हणजे जंत किंवा कृमी होय,जिरे जंतांचासुद्धा नायनाट करतात.पोटामध्ये वायू धरण्याच्या समस्येवर सुद्धा जिरे मात करु शकतात.पोटाशीनिगडीत अपचन,गँसेस, शौचास त्रास होणे,यांसारख्या समस्या जिरे नियमित सेवन केल्यास दूर ठेवता येऊ शकतात.भूक वाढण्यासाठी जिरे हा उत्तम पर्याय आहे.जिरे,आवळा,काळे मीठ आणि ओवा यांच्या मिश्रणाचे नियमित सेवन केल्यास भूक वाढते व खाल्लेले अन्न चांगले पचते.
१३.)जी-यामध्ये एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असतात. जि-यामध्ये शरीराला उपयुक्त असणारे अनेक क्षार सुद्धा असतात.जि-यामध्ये पॉटेशिअम (Potassium),मँगनीज, कॅल्शिअम (Calcium), झिंक (Zinc) आणि मॅग्नेशिअम (Magnesium यांसारखे उपयुक्त घटक असतात.जिरे हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी चा प्रमुख स्त्रोत आहे.
१४.)जीरे हे कफनाशक,पित्तशामक गुणधर्म असलेले आहे.जि-या मुळे भूक वाढण्यास साहाय्य मिळते.जी-यामुळे जुलाब थांबण्यास मदत मिळते. जिरे हे उलटी,मळमळ,अपचन इत्यादी त्रासांवर आरामदायी उपाय आहे.
१५.)वजन कमी करण्यासाठी सुद्धा जिरे सेवन केल्यास प्रभावी फरक दिसून येतो.
सदरहू लेखाचे शब्दांकन डॉक्टर देवेंद्र रासकर यांचे असून, आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.