जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ८९ ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक-२०२३ चा कार्यक्रम घोषीत केला आहे. दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार असून त्याची मतमोजणी दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२३ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणूक निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा आहे.निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी ट्रु वोटर अॅपचा वापर करणे अनिवार्य आहे. यासाठी गुगल/ अॅप प्ले स्टोअर वरुन ट्रु वोटर अॅप डाऊनलोड करुन त्याव्दारे खर्चाचा हिशोब सादर करावा. ट्रु वोटर ॲप बाबत तांत्रिक अडचण असल्यास ७७६७००८६१२, ७७६७००८६१३ व ७७६७००८६१४ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहान उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी केले आहे.