जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी- मिलींद पाटील.)
कोल्हापूर मध्ये तामजाई कॉलनी फुलेवाडी रिंग रोड येथे बयाजी लांबोरे वय- 85 व त्यांची पत्नी सखुबाई बयाजी लांबोरे वय- 82 हे वास्तव्यास असून त्यांनी आपल्या प्रॉपर्टीची रीतसर विभागणी करून दिली आहे.त्यांनी आपला नातू दिलीप बाबुराव लांबोरे यास आपल्याला व आपल्या पत्नीला वृद्धापकाळामध्ये सांभाळण्यासाठी काही प्रॉपर्टी बक्षीस पत्र म्हणून दिली आहे.परंतु ही प्रॉपर्टीची विभागणी त्यांच्या नातवास पसंत न पडल्याने त्यांनी प्रॉपर्टी मध्ये आणखीन वाटा मिळावा यासाठी आपल्या आजी-आजोबां कडे तगादा लावला होता.
दि.२४/१/२०२५ रोजी दिलीप लांबोरे आपली पत्नी संगीता दिलीप लांबोरे व आई बयाबाई बाबुराव लांबोरे व आपली बहीण दिपाली धनाजी कोकरे यांना घेऊन आजी आजोबा कडे प्रॉपर्टी साठी मागणी करण्यास गेला असता,त्यांनी नकार दिला असल्या कारणाने त्यांना लाथाबुक्याने मारून जबर जखमी केले.आपल्या आई-वडिलांना मारहाण का करताय असे विचारण्यास गेलेल्या गंगुबाई दगडू बरगे यांना देखील दिलीप लांबोरे त्यांची पत्नी आणि आई व बहीण यांनी त्यांच्या डोळ्यात चटणी-पुड टाकून व सुरीने त्यांच्या हातावर वार करून त्यांना देखील जखमी केले व परत आमच्या कुटुंबामध्ये परत दखल देण्याचा प्रयत्न केलास तर तुला कायमचे संपवून टाकू.अशी धमकी दिली.
आपल्या भाच्याचे हे रूप पाहून गंगुबाई बरगे यांनी आरडाओरडा करून लोकांना गोळा केले व आपल्या आई-वडिलांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.बयाजी लांबोरे व त्यांची पत्नी सखुबाई बयाजी लांबोरे व त्यांची मुलगी गंगुबाई यांच्यावर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे आरोपी दिलीप बाबुराव लांबोरे त्यांची पत्नी,आई व बहीण यांच्या विरोधात ११८(१),११५(२),३५२,३५१(२), ३(५), कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राजवाडा पोलीस करत आहेत.