कोल्हापूर, दि. 01 (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी आधारकार्ड नोंदीसह हयातीचे दाखले मुदतीत द्यावेत, असे आवाहन तहसिलदार शिरोळ यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील 1 हजार 983 पात्र लाभार्थांनी आपले आधारकार्ड दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पडताळणी (Validation) करावे. 2 हजार 600 पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन हयातीचे दाखले दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तर 461 पात्र लाभार्थ्यांनी दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आधारकार्ड अॅक्टिव्ह करुन बँक खातेशी लिंक करुन घ्यावे.
लाभार्थी अनुदान मिळण्यास पात्र असून ही केवळ आधार पडताळणी, हयातीचे दाखले तसेच आधारकार्ड अॅक्टिव्ह करुन बँक खातेशी लिंक नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आधार पडताळणीसाठी लाभार्थ्यांच्या सोयीसाठी तालुक्यातील शिरोळ, अर्जुनवाड, निमशिरगांव, यड्राव, अब्दुललाट, नांदणी व नृसिंहवाडी या गावांमधील आधार सेंटर व महा ई सेवा केंद्राच्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी या ठिकाणी संपर्क साधून आधार पडताळणी करुन घ्यावी. लाभार्थ्यांना अनुदान मिळणे सोईचे व्हावे यासाठी लाभार्थ्यांची यादी शिरोळ तालुक्यातील सर्व चावडी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.
आधार सेंटर व महा ई सेवा केंद्रांची माहिती पुढीलप्रमाणे- शिरोळ - योगेश ठोमके मो.क्र. 9881695071, अर्जूनवाड- राहुल गायकवाड- मो.क्र. 7387859089, निमशिरगांव- संदीप साजरे- मो.क्र. 9422752679, यड्राव- सतिश प्रभाळकर- मो.क्र. 9890229597 व अब्दुललाट- अच्युत मोहिते- मो.क्र. 9860192131 अशी आहे.