कोल्हापूर, दि. 1 (प्रतिनिधी): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे सप्टेंबर 2025 चा सुधारीत मासिक दौरा आयोजित केला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे.
कल्याण संघटकांचा दौरा पुढीलप्रमाणे-
दि. 11 सप्टेंबर 2025- दुसरा गुरुवार, तहसिल कार्यालय, गडहिंग्लज ता. गडहिंग्लज.
दि. 12 सप्टेंबर 2025- दुसरा शुक्रवार, तहसिल कार्यालय, चंदगड ता. चंदगड
दि. 18 सप्टेंबर 2025 -तिसरा गुरुवार, तहसिल कार्यालय, शाहूवाडी ता. शाहुवाडी
दि. 26 सप्टेंबर 2025-चौथा शुक्रवार, तहसिल कार्यालय, आजरा ता. आजरा.
तहसिलदार यांच्या कार्यालयातील सर्व दौरे निर्देशित ठिकाणी होतील. या दिवशी शासकीय किंवा इतर सुट्टी असल्यास त्या तालुक्याचा दौरा पुढील महिन्यात घेण्यात येईल, असेही श्री. चवदार यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.