जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी, नियमित चालण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चयापचय क्रिया गतिमान होते. प्रत्येक माणसाने किमान 10 मिनिटे चालल्यानेसाखर नियंत्रित होते. सतत नियमित 10 मिनिटे चालल्यामुळे ब्लड ग्लुकोज मध्ये सुधारणा होते.
किमान 20 मिनिटे चालण्याने, शरीराला वृद्धत्व येण्याची प्रक्रिया मंदावते .दररोज नियमित 20 मिनिटे चालल्याने, मायटोकॅड्रियांच्या कार्यामध्ये सुधारणा होऊन, विविध अवयवांना 90% ऊर्जा प्राप्त होते व वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते .
किमान 30 मिनिटे चालल्याने शरीरिक प्रतिकारक क्षमता वाढून, शरीराचे संरक्षण करणाऱ्या बी सेल्स, टी सेल्स ,किलर सेल्स ची संख्या वाढून, रोगप्रतिकारक क्षमता वाढते .त्याचबरोबर वेगवेगळ्या अवयवांमध्ये रक्तसंचार चांगला होतो.
किमान 40 मिनिटे चालल्याने मानसिक तणाव कमी होऊन ,स्लीप हार्मोन्सची पातळी वाढवून, चांगली झोप येते. तणाव कमी होतो. शिवाय शारीरिक स्नायू मजबुती मिळते.
किमान 50 मिनिटे चालल्याने, शारीरिक वजन घटनेची प्रक्रिया चालू होऊन, रोज 350 ते 400 कॅलरीज घटू शकतात. शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहते.
किमान 60 मिनिटे चालल्याने सरासरी आयुष्यमान वाढते शारीरिक मेंदू व मज्जातंतू हे दोन्हीही शांत राहून, विचार करण्याची क्षमता वाढते .सर्जनशीलता वाढते. 60 मिनिटे चालल्याने शरीराच्या जवळजवळ सर्व अवयवांना फायदा होतो. त्यामुळे माणसाचे सरासरी आयुष्य हे वाढत जाते. एकंदरीतच नियमित चालल्याने, रक्ताभिसरण चांगले होऊन, शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच शारीरिक अवस्थेची क्षमता वाढली जाते.
या सर्व गोष्टींसाठी व शारीरिक तंदुरुस्ती ठेवण्यासाठी नियमित चालणे हे आरोग्यास फार फायदेशीर आहे. ही माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची मते लक्षात घेऊन ,जनहितार्थ प्रसारित करण्यात आली आहे.