जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात काल घरोघरी सोन पावलांनी आलेल्या गौरीचे पूजन,अतिशय उत्साहात झाले असून,सर्वत्र गणपती बरोबरच गौरी पूजनाचा आनंद,अतिशय उत्साहजनक जाणवला आहे. महाराष्ट्र राज्यात काल गौरी पूजनाचा उत्साह अलौकिक स्वरूपात जाणवला असून,घरोघरी गौरीची किंवा महालक्ष्मीची किंवा परंपरेनुसार विविध रूपातल्या गौरीच्या शक्तीची, विधीवत,मिरवणुकीने महिलावर्गांनी वाजत गाजत घरी आणून पूजा केली आहे.
नाशिक येथील शहाणे कुटुंबियांनी जर्मनीहून महालक्ष्मीच्या मूर्ती मागवल्या असून, राजस्थान मधील पॅलेसची अनोखी सजावट,महालक्ष्मीची स्थापनेच्या वेळी करण्यात आली आहे. नाशिक मधील शहाणे कुटुंबीयांनी महालक्ष्मीची मूर्ती जर्मनीहून मागवून,त्या मूर्तीस साजेसा असा साज शृंगार करण्यात आला असून त्यासाठी जवळपास 2 लाख रुपये खर्च केला आहे. महाराष्ट्रात सर्वत्र घरोघरी काल गौरी पूजनाचा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहात व अलौकिक स्वरूपात झाला असल्याचे पाहण्यात आले आहे. घरोघरी गौरीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य व विविध पक्वानांचा नैवेद्य करण्यात आला होता. श्री गणेश पूजना बरोबर गौरीपूजनाचाही आनंद काल घरोघरी कुटुंबीयांनी लुटला आहे.