जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली मतदार संघातील वसगडे ता.पलूस जि.सांगली येथील पुणे-मिरज-लोंढा रेल्वे दुहेरीकरणामुळे शेतकऱ्यांचे बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.शेतमालची वाहतूक करणेसाठी रस्ता व रेल्वेच्या नवीन होणाऱ्या मार्गामुळे उपस्थित झालेल्या ड्रेनेजचा प्रश्न सोडवणेबाबत बरेच दिवस झाले मी आणि पलूस - कडेगाव विधानसभा आमदार मा. विश्वजीत कदम प्रयत्न करत होतो.त्यासाठी सांगली जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त,मा पालकमंत्री यांच्यासोबत बैठकासुध्दा झाल्या.परंतु,यावर योग्य तोडगा निघत नव्हता.
त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊन या मागण्याबाबत आंदोलने, रस्ता रोको, जल समाधी आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले. परंतु तरीही मार्ग निघत नव्हता.या पार्श्वभूमीवर मी केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री मा.ना.रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा करून या ज्वलंत प्रश्नाबाबत तत्काळ बैठक आयोजित करण्याची मागणी केली.तसेच हमाल पंचायतीचे विकास मगदूम ह्यानी हमालां चे प्रश्न ह्यावेळी मांडले.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री महोदयानी आज छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथे तत्काळ बैठक लावून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या.यावेळी या बैठकीसाठी माझ्यासह,आमदार विश्वजीत कदम,रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी सांगली तसेच महसूल विभागातील अधिकारी नरेश लालवणी GM Central railway,इंदुरणी दुबे drm,कैलास वर्मा भाजप रेल्वे आघाडी, उपस्थित होते.